नरेंद्र मोदी चौकीदार है, बाकी सब भागीदार है; रामदास आठवलेंची खास कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 04:42 PM2019-04-12T16:42:20+5:302019-04-12T18:41:28+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभेत रामदास आठवलेंच्या शीघ्रकवितांनी चांगला प्रतिसाद मिळवला.

Ramdas Athavale's special poem on Narendra Modi | नरेंद्र मोदी चौकीदार है, बाकी सब भागीदार है; रामदास आठवलेंची खास कविता

नरेंद्र मोदी चौकीदार है, बाकी सब भागीदार है; रामदास आठवलेंची खास कविता

 अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज सकाळी साडेअकरा वाजता पार पडली. यावेळी केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्या शीघ्रकवितेला चांगलाच प्रतिसाद मिळविला. यावेळी नरेंद्र मोदी यांचे आठवलेंनी भरभरून कौतुक केले. 


आठवले म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री कार्यसम्राट नरेंद्र मोदीजी काही मिनिटातच येथे येणार आहेत. डॉ. सुजय विखे तरूण आहे. मी सारखा विचार करत होतो. मी त्यांना सोडून इकडे आलोय. तुम्ही तिकडे काय करता. सुजयने अतिशय चांगला निर्णय घेतला. अन तो भाजपात आला. मागच्या वेळेस मी शिर्डीत पडलो. पडलो पण लगेच उभा राहिलो. एकटाच नाही पडलो त्यांना सुध्दा पाडले. बाळासाहेब विखे पाटील मला दिल्लीत भेटायचे. ते मला म्हणायचे तुम्ही शिर्डीत या. मी त्यांना म्हणायचो तुम्ही तिथे जा. पण त्यांना अहमदनगरची जागा दिली नाही. त्यामुळे ते नाराज झाले. त्यामुळे दोन्ही जागांवर आघाडीचा पराभव झाला.

आता मला तिकिट काही मिळाले नाही. म्हणून मी नाराज होतो. पण नाराज होऊन जायचे कुठे. काँग्रेस-राष्ट्रवादी खायलाच महाग आहेत. मी तिकडूनच आलोय. त्यामुळे इथचं थांबू म्हटलं. मला माहिती आहे कुठून अन कसं मिळवायचं, असेही आठवले म्हणाले.

काय म्हणाले, आठवले...

संग्राम जगताप इथे पडणार आहेत फिके,
आणि निवडून येणार आहेत सुजय विखे...
आता हे लोक राहिले नाहीत मुके,
 मग का निवडून येणार सुजय विखे...

आम्हाला नको आहेत,
तुमच्याकडून फक्त फुलांचे बुके
आम्हाला नको आहेत, 
तुमच्याकडून फक्त फुलांचे बुके
आम्हाला तर हवे आहेत,
डॉ.सुजय विखे

मी इथे आलो आहे,
सुजयला आणि सदाशिव लोखंडेंना निवडून देण्यासाठी...
आणि मी मुंबईला जात आहे,
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बदला घेण्यासाठी....
मी इथे आलो आहे,
तुम्हाला सामाजिक न्याय देण्यासाठी...
मी दिल्लीला जात आहे,
मोदींचा जवळचा मित्र होण्यासाठी...

नरेंद्र मोदीजी अंगार है,
बाकी सब भंगार है 
नरेंद्र मोदीजी चौकिदार है, 
बाकी सब भागीदार है 

महाराष्ट्रात आता सोबत आहे भाजप-शिवसेना
त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीचा दैना

Web Title: Ramdas Athavale's special poem on Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.