रामदास आठवलेंवर रिपाइं कार्यकर्ते नाराज; कोरेगाव-भीमा घटनेतील आंदोलकांवर अन्याय झाल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:38 PM2018-01-17T16:38:29+5:302018-01-17T16:40:10+5:30

पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.

Ramdas Athawalwar RPI activists angry; Emotions of Koregaon-Bhima incident have become an injustice | रामदास आठवलेंवर रिपाइं कार्यकर्ते नाराज; कोरेगाव-भीमा घटनेतील आंदोलकांवर अन्याय झाल्याची भावना

रामदास आठवलेंवर रिपाइं कार्यकर्ते नाराज; कोरेगाव-भीमा घटनेतील आंदोलकांवर अन्याय झाल्याची भावना

अहमदनगर : कोरेगाव-भीमा येथील दंगलीत दलित समाजावर हल्ला झाला. या घटनेचा निषेध करणा-या तरूणांवर पोलिसांनी कलम ३०७ व ३९५ अंतर्गत कारवाई करून पुन्हा अन्याय चालविला आहे. राज्यातील हजारो तरूण आजही जेलमध्ये आहेत. या बाबत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षाने थेट भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र, पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.
भीमा-कोरेगाव घटनेबाबत गायकवाड यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी नगरमध्ये होणा-या शासकीय कार्यक्रमांत प्रवेश करून या सरकारला काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. या आंदोलनात रिपाइंसह समविचारी संघटना व पक्ष सहभागी होणार आहेत.
भीमा-कोरेगावची दंगल ही सरकार पुरस्कृत व पूर्वनियोजित होती. पोलिसांनी योग्य वेळी बंदोबस्त तैनात केला असता तर घटना टळली असती. या घटनेनंतर राज्यभर आंदोलने झाली. आंदोलन करणा-या तरूण व कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून त्यांना अटक केली. सुशिक्षित तरूणांवर सरकार गुन्हेगारीचा शिक्का मारत आहे. कोरेगाव-भीमा येथील घटना ही दलित-मराठा वाद नाही. मात्र काही लोकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. या घटनेनंतर पक्षाने राज्यस्तरीय मोर्चा आयोजित करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झाले नाही. पक्षात राहून जर विचारांचा कडेलोट होत असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे गायकवाड म्हणाले. कोरेगाव-भीमा या घटनेचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्याकडे न ठेवता सुनील रामानंद अथवा कृष्णप्रकाश यांच्याकडे वर्ग करावा अशी मागणी यावेळी गायकवाड यांनी केली.

जिग्नेश मेवानी तरूण नेतृत्व

कुठल्याही चळवळीत विशिष्ट काळानंतर नवीन नेतृत्व उदयाला येत असते. गुजरात विधानसभा निवडणुकीत जिग्नेश मेवानी हा तरूण नेता लोकांमधून निवडून आलेला आहे. त्यामुळे येणा-या काळात मेवानी हे नेतृत्व म्हणून उदयाला येऊ शकतात, असे गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Ramdas Athawalwar RPI activists angry; Emotions of Koregaon-Bhima incident have become an injustice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.