रामनाथ वाघ यांचे काम एक नंबरचे- शरद पवार यांचे गौरवोद्गार, वाघ यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पवार अहमदनगरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:03 PM2020-01-02T12:03:42+5:302020-01-02T12:03:50+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त अॅड. रामनाथ लक्ष्मण वाघ यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार अहमदनगरमध्ये दाखल झाले आहेत.

वाघ यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आणण्यात आले आहे. दुपारी अमरधाम स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
शरद पवार यांनी वाघ यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, रामनाथ वाघ यांचा जन्म एक आॅगस्टला झाला, त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार एक तारखेला झाला. त्यांचे निधनही एक तारखेला झाले. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एक नंबरचे काम केले, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले. यावेळी नगर शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पवार हे प्रथमच नगरला आले आहेत.