व्यायामासाठी ‘सायकल’ धावली; जीम बंदमुळे घरातच व्यायाम

By सुदाम देशमुख | Published: June 17, 2020 12:15 PM2020-06-17T12:15:10+5:302020-06-17T12:16:36+5:30

कोरोना लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी व्यायामशाळा, जीम सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे घरातच व्यायाम करण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. नगर शहरात रोज ७० ते ८० सायकलींची खरेदी होत असून यातून किमान ८० लाखांच्यावर उलाढाल होत आहे. नेहमीपेक्षा सायकलींना दहापट मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Ran a ‘bicycle’ for exercise; Exercise at home due to gym closure | व्यायामासाठी ‘सायकल’ धावली; जीम बंदमुळे घरातच व्यायाम

व्यायामासाठी ‘सायकल’ धावली; जीम बंदमुळे घरातच व्यायाम

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी व्यायामशाळा, जीम सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे घरातच व्यायाम करण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. नगर शहरात रोज ७० ते ८० सायकलींची खरेदी होत असून यातून किमान ८० लाखांच्यावर उलाढाल होत आहे. नेहमीपेक्षा सायकलींना दहापट मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आरोग्य ठणठणीत असणे ही आता प्रत्येकाचीच गरज बनली आहे. जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याची सवय असलेल्यांची पंचायत झाली होती. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच दुकाने उघडली आणि अनेकांनी सायकल खरेदीला पसंती दिली.

 जीमला जाणारे आता सकाळी सायकलवर फिरताना दिसत आहेत. याशिवाय घरातच सायकलिंग करण्यावर लोकांचा भर आहे. त्यासाठी विशेष सायकली बाजारात उपलब्ध आहेत.

गिअरची सायकल, मोठ्या टायरची सायकल, ट्रेड मिल, एअर बॅग्ज, बेअरिंग सायकल खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. लहान मुलांसाठीही खास फॅड बाईक सायकल आलेल्या आहेत. त्यावरही चांगला व्यायाम होतो. वाहतूक सुरू झाल्याने सायकलींचा पुरवठा सध्या तरी व्यवस्थित सुरू आहे.

डंबेल्सची टंचाई
व्यायामासाठी डंबेल्सलाही मोठी मागणी वाढली आहे. शंभर किलोपासून ते पुढील वजनाचे वेगवेगळ््या वजनातील डंबेल्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र सध्या काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा येत असल्याने नगरमध्ये डंबेल्सची टंचाई निर्माण झाली आहे. आतापर्यंत रोज १० ते १२ सेट विक्री होतात, असे विक्रेत्यांनी सांगितले. एक ते दीड हजारापासून त्याच्या किंमती आहेत. 

साध्या सायकली, फॅड बाईकला लहान मुलांची पसंती आहे. ट्रेड मील, एअर बॅग्ज् व बेअरिंगच्या सायकलीच्या विक्रीचे प्रमाण पहिल्यापेक्षा दहापटीने वाढले आहे. व्यायामासाठी ग्राहक याच सायकलींची मागणी करतात, असे तारकपूर येथील विक्रेते सुरेश भागनानी यांनी सांगितले.
 

Web Title: Ran a ‘bicycle’ for exercise; Exercise at home due to gym closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.