रानडुकारांचा हल्ला : महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:02 PM2018-08-18T17:02:53+5:302018-08-18T17:02:56+5:30
शेतात काम करीत असताना करंजी (ता. पाथर्डी) येथील बेबी सुहास अकोलकर या महिलेवर शनिवारी सकाळी रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत.
करंजी : शेतात काम करीत असताना करंजी (ता. पाथर्डी) येथील बेबी सुहास अकोलकर या महिलेवर शनिवारी सकाळी रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. घटनेचे वृत कळताच येथील वनाधिकारी संदीप कराळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.
करंजी परिसरात रानडुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरातील डोंगराच्या जवळ शेती करणा-या शेतक-यांना आतापर्यंत डुकरांचा जास्त त्रास होत होता. पण आता इतर भागातील शेतक-यांच्या पिकांचे तसेच फळबागांचे डुकरांकडून नुकसान होत असल्याच्या तक्रारी या भागातील शेतकºयांनी केल्या आहेत. यापूर्वी परिसरातील अनेक शेतकºयांवर रानडुकरांनी हल्ले केले आहेत. यात एका शेतक-याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.
शनिवारी बेबी अकोलकर आपल्या शेतात गवत घेण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा झाडा-झुडपात लपून बसलेल्या रानडुकरांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला.आरडाओरड करताच डुकरांचा कळप तेथून पसार झाला. या हल्ल्यात रानडुकराने चावा घेतल्याने अकोलकर यांच्या हातावर व चेह-यावर जखमा झाल्या आहेत. वनाधिकारी संदीप कराळे व कर्मचाºयांनी घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे.
रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या करंजी येथील महिला बेबी सुहास अकोलकर यांना सरकारी मदत मिळवून देण्यात येईल.
- संदीप कराळे, वनाधिकारी, करंजी (ता.पाथर्डी).