राणे काँगे्रस सोडणार नाही- पतंगराव कदम
By Admin | Published: May 5, 2017 04:42 PM2017-05-05T16:42:36+5:302017-05-05T16:56:03+5:30
राणे नाराज असले तरी काँगे्रस सोडणार नाहीत़ कोकणात होणाऱ्या संघर्ष यात्रेत राणे सहभागी होणार आहेत,
आॅनलाइन लोकमत
लोणी (अहमदनगर), दि़ ५ - नारायण राणे यांच्याशी मी बोललो आहे़ ते नाराज असले तरी काँगे्रस सोडणार नाहीत़ कोकणात होणाºया संघर्ष यात्रेत राणे सहभागी होणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री पतंगराव कदम यांनी दिली़ पतंगराव कदम लोणी येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, निवडणुकीत जनतेला कर्जमाफी, महिलांसाठी विविध योजना, युवकांना नवीन रोजगाराची आश्वासने देऊन भाजपाने सत्ता मिळवली़ भाजपाने सर्वांचा भ्रमनिरास केला आहे़ भाजप शिवसेनेचं चांगलं चाललं असलं तरी शेतकरी कर्जमाफी, शेतमालाचे ढासळलेले बाजारभाव, वाढती गुन्हेकारी यामुळे जनता मोठा उद्रेक करील़ मुख्यमंत्री निर्णयक्षम नाहीत़ अगोदर जी. आर. काढतात व पुन्हा तो रद्द करतात. आज शेतकरी वर्गाला सरकारच्या मद्दतीची गरज आहे़ पण सरकारकडून मद्दत होत नाही. काँग्रेस पक्ष जनतेसाठी लढा देत आहे. पक्षात गट-तट असले तरी काँग्रेस एकसंघ आहे. नारायण राणे नाराज असले तरी ते पक्ष सोडणार नाहीत़ ते माझे चांगले मित्र आहेत़ मी त्यांच्याशी बोललो आहे़ कोकणात होत असलेल्या संघर्ष यात्रेत ते सहभागी होणार आहेत. तरुणांनी काँग्रेस समजून घेतली पाहिजे. पक्षाचा जुना इतिहास त्यांनी समजून घेतला पाहिजे, असेही कदम म्हणाले़