शनिशिंगणापुरात शनिअमावस्येला तुरळक भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:20 AM2021-03-14T04:20:47+5:302021-03-14T04:20:47+5:30

नेवासा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील शनिअमावस्या यात्रा रद्द केल्यानंतरही शनिवारी दिवसभरात तुरळक भाविकांनी हजेरी लावली. देवस्थान ...

Rare devotees in Shanishinganapura on Saturday | शनिशिंगणापुरात शनिअमावस्येला तुरळक भाविक

शनिशिंगणापुरात शनिअमावस्येला तुरळक भाविक

नेवासा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील शनिअमावस्या यात्रा रद्द केल्यानंतरही शनिवारी दिवसभरात तुरळक भाविकांनी हजेरी लावली. देवस्थान ट्रस्ट व पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवत मंदिर परिसरात कुणासही प्रवेश दिला नाही.

शुक्रवारी दुपारी सुरू असलेली अमावस्या शनिवारी दुपारपर्यंत असल्याने शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणेने शुक्रवारी दुपारी मंदिर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद करून दर्शनव्यवस्था पूर्णपणे बंद केली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी मुख्य रस्त्यासह सर्व रस्त्यांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रा रद्द करूनही तुरळक भाविक आले होते. महाद्वार येथील स्क्रीनवर स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेऊन भाविकांनी समाधान मानले. शुक्रवारी रात्री १२ वाजता, शनिवारी पहाटे साडेचार व सायंकाळी ६ वाजता फक्त पाच जणांच्या उपस्थितीत आरती झाली. यात्रा रद्द असल्याने गावातील सर्व दुकाने व हाॅटेल बंद होते.

----

१३शिंगणापूर

शनिअमावस्येनिमित्त लाखोंची गर्दी होणाऱ्या शिंगणापूर येथे भाविकांची अत्यल्प गर्दी.

Web Title: Rare devotees in Shanishinganapura on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.