भेंडा येथे रास्ता रोको, श्रीगोंद्यात हल्लाबोल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:23+5:302021-07-07T04:26:23+5:30
भेंडा : वाढती महागाई, सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या भावात होणाऱ्या वाढीच्या विरोधात नेवासा तालुक्यातील भेंडा येथे सोमवारी सकाळी रास्ता रोको ...
भेंडा : वाढती महागाई, सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या भावात होणाऱ्या वाढीच्या विरोधात नेवासा तालुक्यातील भेंडा येथे सोमवारी सकाळी रास्ता रोको तर श्रीगोंदा तहसीलसमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगीता ढोले यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, केंद्र सरकारने ‘अच्छे दिन’चे गोंडस स्वप्न दाखवून महागाईचा भडका उडून दिला आहे. अशा सरकारला आता खाली खेचण्याची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार म्हणाले, कोरोनामुळे समाज उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने इंधन दरवाढ करून नागरिकांचा गळा दाबण्याचे काम चालविले आहे. इंधन दरवाढ व महागाई कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, युवकचे अध्यक्ष ऋषीकेश गायकवाड, प्रवीण घनश्याम शेलार, विजय खेतमाळीस, मीनल भिंताडे, दीपाली बोरूडे, संदीप उमाप, सुशीलकुमार शिंदे, अजीम जकाते उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या वतीने सकाळी दहाच्या सुमारास भेंडा बसस्थानकावर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंचायत समितीचे माजी सदस्य शंकर भारस्कर, नेवासा शहर राष्ट्रवादी अध्यक्ष गफुर बागवान, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष दादासाहेब गंडाळ, डाॅ. अशोक ढगे, रज्जाक इनामदार, भाऊसाहेब सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेवासा तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, ॲड. देसाई देशमुख आदींनी भाषणात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत महागाई रोखण्याची मागणी केली.
यावेळी तुकाराम मिसाळ, डाॅ. शिवाजी शिंदे, अशोक मिसाळ, अशोक वायकर, रामकृष्ण नवले, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, जनार्दन कदम, माजी सरपंच गुलाब अढागळे, युवक कार्यकर्ते अमोल अभंग, सनी साळवे, सोपान महापूर, हरिभाऊ नवले, अशोक उगले, बाळासाहेब आरगडे आदी आंदाेलनात सहभागी झाले होते. तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
-----
आता गॅसचे पैसे भरायला पैसे नाहीत..
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग अभंग म्हणाले, केंद्र सरकारने निवडणुकीच्या अगोदर अनेकांना १०० रुपयात घरगुती स्वयंपाकाचा गॅस दिला. आता गॅसचे भाव वाढल्याने सिलिंडर भरायला पैसे नाहीत. सहकारी क्षेत्रातल्या नेत्यांमागे वेगवेगळ्या चौकशी लावणे. अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा पाठीमागे लावणे, असे उद्योग ते करत आहेत, अशी टीका केला.
------
फोटो दोन आहेत
०५ भेंडा१
भेंड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना गणेश गव्हाणे.
------
०५ श्रीगोंदा एनसीपी
श्रीगोंदा येथे तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगीता ढोले यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
050721\img-20210705-wa0153.jpg
भेंडा येथील रास्ता रोको आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग अभंग