श्रीगोंद्यात हरिनामाच्या गजरात रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:11 AM2018-08-09T11:11:10+5:302018-08-09T11:11:15+5:30
सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुकारलेल्या बंद आंदोलनास श्रीगोंदा तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळात आहे.
श्रीगोंदा : सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुकारलेल्या बंद आंदोलनास श्रीगोंदा तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळात आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले असून घारगाव येथे हरिनामाच्या गजरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
श्रीगोंदा शहर, काष्टी, बेलवंडी, कोळगाव, घारगाव, देवदैठण, लोणीव्यंकनाथ, आढळगाव, अजनुज या गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मढेवडगाव, पारगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील सर्व शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तालुक्यातील बस बंद आहेत. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार व राजेंद्र पडवळ यंच्यासह सहका-यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. टाकळी लोणार, कडेवळीत, चांडगाव, शेडगाव, पेडगाव, ढवळगाव ही गावे तरुणाईच्या इशा-यावर बंद झाली. शेतक-यांनी आज ठिकठिकाणी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.