पाण्याच्या मागणीसाठी पाटेगावमध्ये रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:16 PM2018-10-03T12:16:32+5:302018-10-03T12:16:59+5:30
नगर-सोलापूर महामार्गावरील पाटेगाव येथे पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाल्याने टँकर सुरु करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आले.
माहीजळगाव : नगर-सोलापूर महामार्गावरील पाटेगाव येथे पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाल्याने टँकर सुरु करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आले.
पाटेगाव येथील महीलांनी हंडा वाजवून सरकारच्या विरोधात रास्तारोको करण्यात केला. माजी जिल्हा परीषद सदस्य कैलास शेवाळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. कर्जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी तब्बल तीन तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कैलास शेवाळे, किरण पाटील यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर टीका केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.