एका क्लीकवर मिळणार रेशनकार्डाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:21 AM2021-03-23T04:21:21+5:302021-03-23T04:21:21+5:30

अहमदनगर : आता तुमचे रेशनकार्ड एका क्लीकवर पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने एक देश - एक रेशनकार्ड योजनेंतर्गत केंद्र ...

Ration card information will be available with one click | एका क्लीकवर मिळणार रेशनकार्डाची माहिती

एका क्लीकवर मिळणार रेशनकार्डाची माहिती

अहमदनगर : आता तुमचे रेशनकार्ड एका क्लीकवर पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने एक देश - एक रेशनकार्ड योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने ‘मेरा रेशन’ हे मोबाईल ॲप तयार केले आहे. हे ॲप मोबाईलवरील प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपवर रेशन कार्ड क्रमांक (आरसी क्रमांक) टाकल्यानंतर रेशन कार्ड व धान्याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील रेशनकार्ड पाहण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शासनामार्फत विविध उपाय योजले जात आहेत. एखादे रेशनकार्डधारक कुटुंब देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात रोजगारासाठी गेले तरी त्याला धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मेरा रेशन हे ॲप तयार करण्यात आले आहे. प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर होम स्क्रीनवर रजिस्ट्रेशन, तुमचे हक्क, जवळचे रेशन दुकान, तुमच्या नावाने किती धान्य मंजूर झाले आहे, त्याचा भाव किती, आधार सिडिंग आदींची माहिती हिंदी व इंग्रजीत उपलब्ध होणार आहे.

लाभार्थ्यांना मिळणारे धान्य, जवळपास असलेले रास्त भाव दुकान, शिधापत्रिकेवर उचललेल्या धान्याची माहिती, शिधापत्रिका पात्र की अपात्र, लाभार्थ्यांना मिळणारे धान्य आदी माहिती संबंधित ग्राहकाला ॲपवर उपलब्ध होते.

---------------

तक्रार नोंदविण्याची सोय

या ॲपमध्ये एफपीएफ फीडबॅक नावाचा एक ऑप्शन उपलब्ध आहे. यात संबंधित रेशन दुकानदाराची काही तक्रार असल्यास या ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे. दुकानाचा नंबर व मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे.

----------

मराठी भाषेत माहिती नसल्याने अडचण. ‘मेरा रेशन’ या ॲपवर केवळ हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा उपलब्ध आहेत. रेशनचे धान्य उचलणारे कुटुंब कमी शिकलेले असतात. त्यांना केवळ मातृभाषाच समजते. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. त्यापैकी काही भाषांना केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या स्थानिक भाषांमध्ये हे ॲप असणे आवश्यक आहे. मात्र, ही योजनाच केंद्र सरकारने तयार केलेली असल्याने केवळ दोनच भाषांचा यामध्ये समावेश करण्यात आली आहे.

-----------

एकूण रेशनकार्ड-

अंत्योदय-८८६१८

प्राधान्य कुटुंब-६०५५२४

एपीएल-३३५६६०

शुभ्र रेशनकार्ड-५८५८३

एकूण-१०८८३८५

---------

रेशनकार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ‘मेरा रेशन’ ॲप कार्यान्वित झाले असले तरी याबाबत महाराष्ट्र सरकारचा कोणताही आदेश आमच्यापर्यंत आलेला नाही. मात्र, नगर जिल्ह्यातील रेशनकार्डही लवकरच या ॲपवर पाहायला मिळणार आहेत.

- जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी

---------------

डमी -नेट फोटो

२२ पिपल

२२ रेशन

२२ रेशन धान्य

२२ रेशनकार्ड ऑन वन क्लीक डमी

Web Title: Ration card information will be available with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.