रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात; ४१ तांदळाच्या गोण्या जप्त; चौघांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:39 AM2020-04-03T10:39:47+5:302020-04-03T10:40:22+5:30
संवत्सर शिवारातील एका खासगी गोडावूनमध्ये साठवणूक करून ठेवलेला सरकारी रेशन दुकानातील ४१ गोण्या तांदूळ काळ्याबाजारात विक्री करताना आढळून आला. याप्रकरणी रेशन दुकानदारांसह चौघांवर कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी गुरुवार ( दि.२ एप्रिल रोजी ) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या कारवाइ केली आहे. ४१ गोण्या जप्त केल्या आहेत.
कोपरगाव : शहरालगत असलेल्या संवत्सर शिवारातील एका खासगी गोडावूनमध्ये साठवणूक करून ठेवलेला सरकारी रेशन दुकानातील ४१ गोण्या तांदूळ काळ्याबाजारात विक्री करताना आढळून आला. याप्रकरणी रेशन दुकानदारांसह चौघांवर कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी गुरुवार ( दि.२ एप्रिल रोजी ) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या कारवाइ केली आहे. ४१ गोण्या जप्त केल्या आहेत.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कोपरगाव तहसीलचे पुरवठा निरीक्षक सचिन अशोकराव बिन्नोड यांच्या फिर्यादीवरून तांदूळ खरेदी केलेला विनोद पंडीत दुकळे ( रा.हनुमानगर, कोपरगाव ), गाळा मालक चंद्रशेखर त्रिंबक जाधव (रा.येवला रोड, कोपरगाव ), रेशन दुकानदार कैलास दादासाहेब बोरावके (रा.बैलबाजार रोड, कोपरगाव), चालक अन्वर आजम शेख ( रा.लक्ष्मीनगर,कोपरगाव ) यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करून चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान यातील रेशन दुकानदार हा कोपरगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहे.