रयत ही माणूस घडविणारी प्रयोगशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:09+5:302021-09-23T04:23:09+5:30
रयत शिक्षण संस्थेच्या डाकले महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जगधने बोलत होत्या. ...
रयत शिक्षण संस्थेच्या डाकले महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जगधने बोलत होत्या. याप्रसंगी प्रकाश निकम पाटील, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, प्राचार्य मुकुंद पोंधे, परीक्षक एकनाथ दहिफळे, प्रा. रंगनाथ खिलारी उपस्थित होते. स्पर्धेत यश पाटील (बी. के. बिर्ला कॉलेज, कल्याण), शिवम मालकर (भारती विद्यापीठ, सांगली), सुजित काळंगे (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ बक्षिस मिथुन माने याने पटकावले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विवेक मोरे यांनी केले तर आभार समन्वयक डॉ. बापूसाहेब घोडके यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब बावके, डॉ. राजेंद्र कळमकर, प्रा. योगीराज चंद्रात्रे, प्रा. अशोक नाबगे, प्रा. पुष्कर जोशी उपस्थित होते.
---------