‘आरसी बुक’ अभावी वाहन नोंदणी लटकली

By Admin | Published: March 16, 2016 11:47 PM2016-03-16T23:47:36+5:302016-03-16T23:57:08+5:30

अहमदनगर : वाहन खरेदीनंतर आरटीओकडून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) हे स्मार्ट कार्डच्या रुपात दिले जायचे. आता हे कार्ड तयार करण्याचे कंत्राट संपल्याने जुन्या पुस्तिकांचे वाटप केले.

'RC Book' lacks registration for wanting vehicles | ‘आरसी बुक’ अभावी वाहन नोंदणी लटकली

‘आरसी बुक’ अभावी वाहन नोंदणी लटकली

अहमदनगर : वाहन खरेदीनंतर आरटीओकडून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) हे स्मार्ट कार्डच्या रुपात दिले जायचे. आता हे कार्ड तयार करण्याचे कंत्राट संपल्याने जुन्या पुस्तिकांचे वाटप केले. मात्र या पुस्तिकाही आता संपल्याने आरटीओ कार्यालय बुचकळ््यात पडले आहे. आणखी महिनाभर तरी वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळणार नसल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
वाहन खरेदी केल्यानंतर त्याची आरटीओकडे नोंदणी होते. ही नोंदणी झाली आहे, याबाबत पूर्वी गुलाबी, फिकट निळ््या रंगाचे आर.सी. बुक (पुस्तिका)मिळायचे. त्यामध्ये वाहनाचा आणि वाहनमालकाचा सर्व तपशील असायचा. यालाच वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी. बुक) असे म्हटले जाते. पुस्तिका बंद करून दोन-तीन वर्षांपासून हे प्रमाणपत्र स्मार्ट कार्डच्या स्वरुपात मिळत होते. मागील सरकारच्या काळातील कार्ड तयार करणाऱ्या कंत्राटदाराची मुदत संपली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या मोटार वाहन विभागाने स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. सध्या स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम बंद आहे. नगर येथील आरटीओ कार्यालयाने जुने आर. सी. बुक वापरात आणले. त्याही पुस्तिका संपल्याने अधिकारी, वाहनमालक, एजंट गोंधळले आहेत. आर.सी. बुकची छपाई करायची ठरली तरी त्याला किमान एक महिना लागणार आहे. स्मार्ट कार्डबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी किती दिवस लागणार,याबाबत सध्या तरी काहीही सांगता येत नाही. दरम्यान पुढच्या महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती असे सण असल्याने वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्या वाहनधारकांना नेमके कोणते कार्ड देणार, याबाबत सध्या गोंधळाची स्थिती आहे. (प्रतिनिधी)
वाहन नोंदणी कागदावर
वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी. बुक) हे स्मार्ट कार्डच्या स्वरुपात देणे बंद झाल्याने जुन्या पुस्तिकांचे वाटप केले आहे. मात्र त्याही पुस्तिका आता संपल्या आहेत. नव्या पुस्तिका छापण्याबाबतचा निर्णय राज्यस्तरावरून घेतला जातो. त्यामुळे आर.सी. बुक आता नेमके कोणत्या स्वरुपात दिले जाणार आहे, याबाबत स्थानिक पातळीवर कोणतीही माहिती नाही. वाहनाची नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी आरटीओला सहकार्य करावे. ज्यांनी नोंदणी केली, त्यांना त्यांचे प्रमाणपत्र पुस्तिका किंवा स्मार्ट कार्ड आल्यास दिले जाईल. सध्या तात्पुरत्या स्वरुपात कागदपत्र दिले जात आहेत.
-राजाराम गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: 'RC Book' lacks registration for wanting vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.