प्रगतीच्या भविष्यासाठी त्यांनी जुन्या प्रथेची 'बेडी' तोडली, पुनर्विवाहाची गाठ बांधली!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 11:02 AM2019-09-11T11:02:26+5:302019-09-11T11:03:00+5:30

सकल मराठा-देशमुख समाजही परिवर्तन स्वीकारत असल्याचा प्रत्यय एका आगळ्या वेगळ्या पुनर्विवाहाद्वारे आला. या पुनर्विवाहामुळे समाजात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा प्रत्यय  येत आहे.

Re-marrying of progress, a turning point in the Maratha-Deshmukh society | प्रगतीच्या भविष्यासाठी त्यांनी जुन्या प्रथेची 'बेडी' तोडली, पुनर्विवाहाची गाठ बांधली!

प्रगतीच्या भविष्यासाठी त्यांनी जुन्या प्रथेची 'बेडी' तोडली, पुनर्विवाहाची गाठ बांधली!

संगमनेर : सकल मराठा-देशमुख समाजही परिवर्तन स्वीकारत असल्याचा प्रत्यय एका आगळ्या वेगळ्या पुनर्विवाहाद्वारे आला. या पुनर्विवाहामुळे समाजात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा प्रत्यय  येत आहे.
औरंगाबादजवळील चिते पिंपळगाव येथील विलास गणपतराव गावंडे यांच्या गणेश या मुलाचा किनगाव फुलंब्री येथील पंडितराव सोनवणे यांची मुलगी प्रगती हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, पोस्ट आॅफिसमध्ये काम करणाºया गणेश याचा लग्नानंतर अवघ्या वषार्नंतर दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया प्रगतीवर व गावंडे-सोनवणे कुटुंबावर आभाळ कोसळले. या दु:खद प्रसंगी संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील सामाजिक कार्यकर्ते, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व उपप्रांतपाल सुनील कडलग, अहमदनगर गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग या चितेगाव येथे नातेवाईक गावंडे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी प्रगतीच्या उज्वल भवितव्यासाठी तीचा पुनर्विवाह गणेशचा भाऊ निखिल याच्याबरोबर करवून द्यावा, असा प्रस्ताव ठेवला. मुलाच्या कुटुंबातील सदस्यांना भावनिक आवाहन केले. त्यातच विलासराव गावंडे यांचे मेव्हणे जवळे कडलग या गावचे सरपंच कैलास अण्णा देशमुख आणि मुलाचे मामा नानासाहेब निवृत्ती मोराडे यांनी हा प्रस्ताव उचलून धरला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रगती-निखिल यांचे व गावंडे-सोनवणे कुटुंबातील सदस्यांचे मन वळविले. काही लोकांना हा प्रस्ताव काही पचनी पडला नाही. मात्र गावंडे-सोनवणे या सकल मराठा-देशमुख समाजातील कुटुंबाने प्रगतीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बदलाचे वारे स्वीकारले. विरोधाला न जुमानता मंगळवारी (दि.१०) वेरूळ, औरंगाबाद येथील अक्काबाईचा मठ येथे हा क्रांतिकारी व सुधारणावादी विवाह पार पाडला.
 अत्यंत साध्या पद्धतीने व केवळ तिनशे लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी माजी आमदार रामभाऊ अप्पा गावंडे, अक्का महाराज, चिते पिंपळगावचे सरपंच कल्याणराव गावंडे, लता कवडे, अंकुश देशमुख,  विजय रोडे, मोहनराव आहेर, सर्जेराव देशमुख, योगेश रामनाथ कडलग, राजेंद्र शांताराम कडलग, किरण देशमुख उपस्थित होते. 

Web Title: Re-marrying of progress, a turning point in the Maratha-Deshmukh society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathaमराठा