‘मिनिस्टर नव्हे होम मिनिस्टर’ स्पर्धेला सखींचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 10:31 PM2016-02-17T22:31:32+5:302016-02-17T22:41:11+5:30
अहमदनगर : कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ तर्फे सभासद झालेल्या सखींसाठी मिनिस्टर नव्हे ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
अहमदनगर : महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ तर्फे सभासद झालेल्या सखींसाठी मिनिस्टर नव्हे ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सखींनी स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदवत बक्षिसांची लयलूट केली. बक्षिसे पटकावणाऱ्या सखींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
बुधवारी सकाळी ११ वाजता भूषणनगर, रभाजी कोतकरनगर, दुपारी २ वाजता इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय भवानीनगर, सायंकाळी ४ वाजता गायत्री मंदिर पटांगण, महाजन गल्ली या ठिकाणी मिनिस्टर नव्हे होम मिनिस्टर स्पर्धा पार पडली. टिकल्या लावणे, फोर कॉर्नर, म्युझिकल रिंग यासह विविध स्पर्धा पार पडल्या. विहीत वेळेत दिलेली कृती पूर्ण करण्यासाठी स्पर्धक सखींची धावपळ झाली. वातावरणातील उत्साह इतर सखींची उत्कंठा वाढवत होता.सखींना ‘लोकमत सखी मंच’च्या सभासद होण्याची संधी आहे. कार्यक्रम स्थळीदेखील सखींना सभासद होता येणार असून सभासद झालेल्या सखींना मिनिस्टर नव्हे होम मिनीस्टर मध्ये सहभागी होता येईल.स्पर्धेत विजयी होणाऱ्या सखींना कार्यक्रमाचे गिफ्ट सुविधा मार्केटचे ज्ञानेश्वर गाडे, सुनीता गाडे, सुहानाचे प्रमोद देशमुख, महानंदाच्या अनिता सोनी यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सखी मंच विभाग प्रतिनिधी अलका मुंदडा, वर्षा पितळे, बबीता गांधी यांनी सहकार्य केले.सदरील कार्यक्रमास महानंदा ग्रुपचे प्रायोजकत्व लाभाले आहे. तसेच गिफ्ट प्रायोजक म्हणुन सुविधा मार्केट व सुहाना मसाले यांचे सहकार्य लाभाले आहे.