तपसाधनेमुळे दिव्य अनुभवाची प्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:07 PM2019-10-23T12:07:54+5:302019-10-23T12:08:37+5:30
नवपद आराधनेत सम्यक पद तपाला महत्व आहे. सिध्दचक्र तपसाधनेमुळे दिव्य अनुभव प्राप्त होतात. मंत्र, यंत्र, लब्धी आदी शक्तिशाली तत्वाचा या तपसाधनेत समावेश आहे. सिध्दचक्र तपाने मन:शांती मिळते.
सन्मतीवाणी
नवपद आराधनेत सम्यक पद तपाला महत्व आहे. सिध्दचक्र तपसाधनेमुळे दिव्य अनुभव प्राप्त होतात. मंत्र, यंत्र, लब्धी आदी शक्तिशाली तत्वाचा या तपसाधनेत समावेश आहे. सिध्दचक्र तपाने मन:शांती मिळते. जिनशासनाच्या आराधनेमुळे सुख, शांती, समाधान प्राप्ती होते. सिध्दचक्राची तपसाधना कठीण आहे. परंतु श्रध्दापूर्वक केली तर अपेक्षित फळ मिळते. नवपदातील सम्यक तप सिध्दचक्र हे सर्वांत महत्वाच्या स्थानी आहे. सर्व विश्वाचे सार नवपदात आहे. नऊ तत्वांची आराधना म्हणजे नवपदाची आराधना करणे होय. नवपदाची गाडी आपल्याला मोक्षाच्या स्थानकाकडे नेते. नवपद आराधनेमुळे सुख-शांतीबरोबर रोग निवारण होऊ शकते. लब्धीचक्राच्या तपामुळे पुरुषार्थ केल्याचा अनुभव मिळतो. सशाजधना केल्याने कर्माची निर्जरा होते. या आराधनेमुळे सिध्दत्व प्राप्त होते. सिध्दचक्र हृदयात स्थापन करा. श्रीपाल, मैनासुंदरी यांनी ही आराधना सर्वांना सांगितली. चैत्र व आश्विन या दोन महिन्यातच ही साधना करतात. त्यामुळे अनंत सिध्दीकडे जाण्याचा मार्ग खुला होतो. हृदयात स्थापन केलेल्या सिध्दचक्र स्वरुपी कमळाच्या प्रत्येक एका पाकळीचे नऊ दिवस ध्यान करा. त्याचा प्रभाव जाणवतो. वेगळे अनुभव मिळतील. या आराधनेमुळे जीवनाला नवीन दृष्टी मिळते. या आराधनेमुळे तीर्थकरांच्या पायाशी सर्व वैभवाने लोळण घेतली. सिध्दचक्राची आराधना हे एक पुण्यकर्म आहे.
- पू.श्री.सन्मती महाराज