कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरणातून आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 06:29 PM2018-03-04T18:29:05+5:302018-03-04T18:40:59+5:30

कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे.

Recapture from Pimpalgaon Joga dam in Kukadi project | कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरणातून आवर्तन सोडले

कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरणातून आवर्तन सोडले

ठळक मुद्देजुन्नर, पारनेरला फायदा होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
बोटा : कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचा जुन्नर व पारनेर तालुक्यातील शेतीला फायदा होणार आहे.
पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचा शेवट पारनेर तालुक्यातील वडझिरे तलावात होतो. ७१ किलोमीटर लांबीचा असणारा हा कालवा पारनेर तालुक्यात २५ किलोमीटर लांबीचा आहे. पारनेर तालुक्यातील जिरायती भागाला हा कालवा वरदान ठरला आहे.
या धरणाच्या कालव्याचे आवर्तन गुरूवारी सायंकाळी सोडण्यात आले असल्याचे कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर व उपविभागीय अभियंता मिलींद बागुल यांनी सांगितले. सोमवारी हे पाणी वडझिरे तलावात पोहचणार आहे. या आवर्तनामुळे पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार असून पारनेर तालुक्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्रफळावर रब्बी पिकांना फायदा होणार आहे.

 

Web Title: Recapture from Pimpalgaon Joga dam in Kukadi project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.