आंतरजातीय विवाह लाभार्थ्यांचे ६० लाख अनुदान प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:15 AM2021-06-26T04:15:59+5:302021-06-26T04:15:59+5:30

अहमदनगर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबविण्यात ...

Received 60 lakh grant from inter-caste marriage beneficiaries | आंतरजातीय विवाह लाभार्थ्यांचे ६० लाख अनुदान प्राप्त

आंतरजातीय विवाह लाभार्थ्यांचे ६० लाख अनुदान प्राप्त

अहमदनगर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबविण्यात येते. याअंतर्गत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या प्रत्येकी ५० हजार रुपये आर्थिक सहाय देण्यात येते. त्यानुसार १२० जणांचे ६० लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील दांपत्यांना वितरण करण्यात आले.

गुरुवारी जिल्हा परिषदेत या अनुदानाचा धनादेश जि.प. अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सभापती उमेश परहर, काशिनाथ दाते, सुनील गडाख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जि.प. सदस्य संदेश कार्ले, हर्षदा काकडे, अजय फटांगरे, जालिंदर वाकचौरे, समाजकल्याण अधिकारी देवीदास कोकाटे, वासुदेव सोळंके, डॉ. संदीप सांगळे, परीक्षित यादव आदी उपस्थित होते.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, बौध्द धर्मात धर्मांतर केलेल्या अनुसूचित जातींच्या व्यक्ती, विशेष मागासवर्ग यापैकी एका व्यक्तीने सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन व शीख या व्यक्तीशी विवाह केल्यास अथवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, बौध्द धर्मांतरीत अनुसूचित जातींच्या व्यक्ती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी दोन वेगवेगळ्या प्रवर्गातील व्यक्तींनी विवाह केल्यास त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. असा आंतरजातीय विवाह १ फेब्रुवारी २०१० पूर्वी झाला असल्यास १५ हजार रुपये व दि. १ फेब्रुवारी २०१० नंतर झाला असल्यास ५० हजार रुपये अर्थसहाय दिले जाते. नुकतेच जिल्हा परिषदेला ६० लाख रुपये अनुदान प्राप्त झाले. यातून १२० जणांना वाटप करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

--------------

२१० जणांचे अनुदान अजूनही प्रलंबित

सध्या आलेले ६० लाखांचे अनुदान हे २३ सप्टेंबर १९ अखेरपर्यंतचे आहे. त्यानंतर आजअखेर एकूण २१० जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. समाजकल्याण विभागाकडून त्यासाठी प्रत्येकी ५० हजार या प्रमाणे १ कोटी ५ हजार रुपयांच्या रकमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

--------------------

फोटो - २५झेडपी समाजकल्याण

आंतरजातीय विवाह लाभार्थ्यांना अनुदानाचे धनादेश जि.प. अध्यक्षा राजश्री घुले, तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

Web Title: Received 60 lakh grant from inter-caste marriage beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.