ग्रामपंचायतीकडून वीज बिल वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:51+5:302021-02-10T04:20:51+5:30
यावेळी महावितरण उपकेंद्र घारगाव १ चे सहायक अभियंता निखिल शेलार, वायरमन नवनाथ आभाळे, विकास लामखडे, प्रदीप कडाळे,सामाजिक कार्यकर्ते नितीन ...
यावेळी महावितरण उपकेंद्र घारगाव १ चे सहायक अभियंता निखिल शेलार, वायरमन नवनाथ आभाळे, विकास लामखडे, प्रदीप कडाळे,सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
* * * *कृषी वीज बिलाची अत्यल्प वसुली महावितरणची डोकेदुखी ठरत आहे . वाढत्या थकबाकीमुळे दैनंदिन अर्थगाडा चालविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने ऊर्जा विभाग आणि महावितरणने वसुलीसाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत ग्रामपंचायतींना वीज वसुलीचे अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महावितर च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इच्छुक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत तसा ठराव केल्यास त्यांच्यासोबत महावितरण करार करणार आहे. ग्रामपंचायतीवर स्थानिक लोकांनी निवडलेले लोकप्रतिनिधी असतात. त्यांचे स्थानिक रहिवासी म्हणजेच * * *कृषी ग्राहकांशी चांगले संबंध असतात, त्यामुळे वीज बिल भरण्यासाठी ते ग्राहकांना चांगल्या पद्धतीने प्रोत्साहित करू शकतील . त्याचा मोबदलाही ग्रामपंचायतींना मिळेल . थकबाकीच्या वीस ते तीस टक्के मोबदला देण्याचे ऊर्जा विभागाने निश्चित केले आहे . त्यामुळे ग्रामपंचायतींच्या गंगाजळीतही वाढ होईल .
.............
असा मिळेल मोबदला
वीज बिल भरणा केंद्र म्हणून प्रती वीज बिल ५ रुपये
जुनी थकबाकी वसूल केल्यास थकबाकीच्या ३० टक्के
चालू वीज बिल वसूल केल्यास वसुलीच्या २० टक्के
................
कृषी ग्राहकांना फायदा
शंभर टक्के वीज बिल वसुली असलेल्या रोहित्रावरील कृषी ग्राहकांना चालू बिलावर १० टक्के अतिरिक्त सवलत मिळेल. थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीज बिल वसुली असणाऱ्यांना योजना कालावधीत बिलावर ५ टक्के अतिरिक्त सवलत दिली . जाईल