ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:56+5:302021-06-16T04:28:56+5:30
संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, माजी जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत काकड, तालुकाध्यक्ष राहुल जऱ्हाड, उपाध्यक्ष सोमनाथ ...
संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, माजी जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत काकड, तालुकाध्यक्ष राहुल जऱ्हाड, उपाध्यक्ष सोमनाथ फापाळे, सचिव तृप्ती जोर्वेकर, संघटक ऋषिकेश वाकचौरे यांसह गौरी राऊत, कमलेश गायकवाड, राधेश्याम थिटमे, सानिया शिंदे, सागर गुंजाळ, आकाश पानसरे, गणेश जोंधळे, हर्षल कोकणे, शीतल रोकडे, साहिल जोर्वेकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
राज्यात कोरोनाचे संकट असताना शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. या संकटात अनेकांचे रोजगार गेले. कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, रस्त्यावर आली. अनेक जण आर्थिक संकटात असताना संस्थाचालक ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट करत आहेत. विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क वसूल करण्यात येत आहे. यात मुख्यमंत्र्यांसह, शिक्षणमंत्री तसेच इतरही मंत्री लक्ष घालायला तयार नाही. विद्यार्थ्यांच्या पालकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन शिक्षणाला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी १ हजार ५०० रुपये द्यावेत. कोरोना काळात सर्वच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी. शिक्षण देणे ही सरकारचीच जबाबदारी असून ते मोफत मिळावे, अशी मागणी छात्रभारतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे.
.........१५छात्रभारती