दंडात्मक कारवाईतून दोन लाखांची वसुली

By | Published: December 5, 2020 04:34 AM2020-12-05T04:34:26+5:302020-12-05T04:34:26+5:30

नेवासा : नेवासा पोलिसांनी वीस दिवसांत विनामास्क, विना परवाना, ट्रिपल सीट वाहनधारकांकडून एक लाख ९४ हजार रुपयांचा दंड वसूल ...

Recovery of Rs 2 lakh from penal action | दंडात्मक कारवाईतून दोन लाखांची वसुली

दंडात्मक कारवाईतून दोन लाखांची वसुली

नेवासा : नेवासा पोलिसांनी वीस दिवसांत विनामास्क, विना परवाना, ट्रिपल सीट वाहनधारकांकडून एक लाख ९४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी तालुक्यात ११ ते ३० नोव्हेंबर या २० दिवसांच्या कालावधीत विना मास्क, दुचाकीस्वारांवर दंडाची कारवाई करून ९४७ लोकांकडून प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे ९४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. त्याचबरोबर विना परवाना, ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४०९ व्यक्तींवर कारवाई करून ९९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांतून नेवासा पोलिसांनी १ लाख ९४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, उपनिरीक्षक भरत दाते, प्रदीप शेवाळे, पोलीस नाईक किशोर काळे, पोलीस नाईक राजेंद्र काळे, पोलीस नाईक गणेश गलधर, पो. कॉ. अमोल बुचकुल, होमगार्ड दिगंबर ताके, शुभम्‌ गोरे, आदेश भक्त यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Recovery of Rs 2 lakh from penal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.