लॉकडाऊन काळात वसुली माफ करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:19 AM2021-05-14T04:19:58+5:302021-05-14T04:19:58+5:30

अमित मुथ्था यांच्या मागणीची नोंद घ्यावी व घरपट्टी, पाणीपट्टी, कर्ज, वीज बिल माफ करावे यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा ...

Recovery should be waived during lockdown | लॉकडाऊन काळात वसुली माफ करावी

लॉकडाऊन काळात वसुली माफ करावी

अमित मुथ्था यांच्या मागणीची नोंद घ्यावी व घरपट्टी, पाणीपट्टी, कर्ज, वीज बिल माफ करावे यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. सर्व ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या उपोषणाची दखल घेत आपापल्या शहरात उपोषण करावे, तरच सरकारला जाग येईल, अशी भावना अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांच्या मागणीसाठी अमित मुथ्था यांनी भर उन्हात एकट्याने उपोषण केले. त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पोफळे यांनी पाठिंबा दिला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल भनगडे, मनसेचे जिल्हा अध्यक्ष बाबा शिंदे, मर्चन्टस् असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेश गुंदेचा, महावीर पाटणी, नितीन गदिया, भगवान वलेशा, प्रमोद चोरडिया, नरेंद्र सोमाणी, नवीन गदिया यांनी उपोषणस्थळी भेट देत मुथ्था यांना पाठिंबा दिला.

Web Title: Recovery should be waived during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.