धोत्रे गावात महावितरणकडून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण
By | Published: December 6, 2020 04:21 AM2020-12-06T04:21:10+5:302020-12-06T04:21:10+5:30
ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील वीज ग्राहकांशी संवाद साधून बिलासंदर्भातील तक्रारी निवारण्यासाठी महावितरणतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोपरगाव ...
ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील वीज ग्राहकांशी संवाद साधून बिलासंदर्भातील तक्रारी निवारण्यासाठी महावितरणतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोपरगाव ग्रामीण उपविभागातंर्गत असलेल्या धोत्रे गावातील ग्राहकांच्या वीजबिलासंदर्भात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. यामध्ये चुकीच्या वीजबिलांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच गावातील वाकलेले विजेचे खांब सरळ करून वीजतारा ओढण्यात आल्या. ग्राहकांच्या खराब झालेल्या सर्विस वायर बदलून देण्यात आल्या. गावातील खराब झालेल्या रोहित्रांचे बॉक्स बदलले, तसेच काही ठिकाणी नवीन खांब उभारले. हा उपक्रम कोपरगाव ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. वारी वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता व्ही. टी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता एस. डी. वाणी, एस. के. घुमरे तसेच कनिष्ठ अभियंता डी. जी. सावदेकर, आर. बी. काकड, एम. आर. घोलप, जे. जी. बोरसे, एन. आर. निकम व सहाय्यक लेखापाल एस. ए. ढाकणे यांनी सक्रिय सहभाग नोंदिवला आहे.