सीटीस्कॅनचे दर कमी केल्याने रुग्णांना दिलासा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:25+5:302021-04-17T04:19:25+5:30

कोपरगाव : कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘एचआरसीटी’ तपासणी करावी लागते. यासाठी २५०० रुपये आकारण्यात येतात. यामध्ये ...

Reducing the rate of CT scan will bring relief to the patients | सीटीस्कॅनचे दर कमी केल्याने रुग्णांना दिलासा मिळणार

सीटीस्कॅनचे दर कमी केल्याने रुग्णांना दिलासा मिळणार

कोपरगाव : कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘एचआरसीटी’ तपासणी करावी लागते. यासाठी २५०० रुपये आकारण्यात येतात. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक अडचण होत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी दर कमी करण्याची विनंती संबंधित निदान केंद्रांना केली होती. यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, २३०० रुपये दर केला आहे. या निर्णयाचा गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दडीयाल म्हणाले, कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. रोज नवनवे व्यक्ती बाधित होत आहेत. विषाणूची लागण झाली आहे का नाही याचे निदान करण्यासाठी डॉक्टर 'एचआरसीटी' (स्कॅन) करण्यास सांगतात. यासाठी २५०० रुपये आकारण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक अडचण होत होती. याची दखल घेऊन शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांसह संबंधित निदान केंद्रांना दर कमी करण्याची विनंती केली होती. त्यास यश मिळाले आहे.

Web Title: Reducing the rate of CT scan will bring relief to the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.