फोटो स्टेटसला ठेवण्यास नकार, दिल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला, चौघां विरोधात गुन्हा: तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 04:03 PM2020-06-16T16:03:03+5:302020-06-16T16:03:12+5:30

अहमदनगर: आरोपीचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवण्यास नकार दिल्याने चौघांनी तरुणावर कोयता व लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी केले. शहरातील बालिकाश्रम रोड परिसरातील निलक्रांती चौक येथे 14 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

Refusal to keep photo status, assault on youth for giving, crime against four: Three arrested | फोटो स्टेटसला ठेवण्यास नकार, दिल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला, चौघां विरोधात गुन्हा: तिघांना अटक

फोटो स्टेटसला ठेवण्यास नकार, दिल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला, चौघां विरोधात गुन्हा: तिघांना अटक

अहमदनगर: आरोपीचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवण्यास नकार दिल्याने चौघांनी तरुणावर कोयता व लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी केले. शहरातील बालिकाश्रम रोड परिसरातील निलक्रांती चौक येथे 14 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या मारहाणीत अमोल हिरामण गायकवाड (वय 19 रा. गौतमनगर, निलक्रांती चौक) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी गायकवाड याने तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून टिंग्या उर्फ सुमेघ साळवे, गौरव साळवे महेश परदेशी व सोन्या नाळकोर यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न व आर्म कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुमेघ साळवे, महेश परदेशी व सोन्या नाळकोर यांना अटक केली आहे तर गौरव साळवे हा फरार आहे. 14 जून रोजी रात्री अमोल गायकवाड व त्याचा भाऊ हे त्यांच्या  घराच्याबाहेर उभा असताना तेथे वरिल चार आरोपी आले. गायकवाड याला सुमेघ साळवे याचा फोटो स्टेटसला का ठेवला नाही अशी विचारणा करत या चौघांनी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी सुमेघ साळवे याने कोयत्याने गायकवाड याच्या डोक्यात वार गेल्याने तो गंभीर जखमी झाला. असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुंडे हे करत आहेत.

Web Title: Refusal to keep photo status, assault on youth for giving, crime against four: Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.