नगरमधील उपोषणकर्त्यांचा तपासणी करण्यास नकार; पथक माघारी
By अण्णा नवथर | Updated: October 31, 2023 14:19 IST2023-10-31T14:19:21+5:302023-10-31T14:19:55+5:30
उपोषणकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने हे पथक परत गेले.

नगरमधील उपोषणकर्त्यांचा तपासणी करण्यास नकार; पथक माघारी
अहमदनगर: शहरातील नगर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणाऱ्या मराठा तरुणांची तपासणी करण्यासाठी मंगळवारी दुपारी डॉक्टरांची एक पथक उपोषण स्थळी दाखल झालेले होते. मात्र उपोषणकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने हे पथक परत गेले.
आरक्षणाच्या मागणीसाठी नगर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आलेले आहे. काल सोमवारपासून गोरख दळवी व अमोल हुंबे यांच्यासह चार जणनी आमरण उपोषण केलेले आहे. त्यांच्या अमरण उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक उपोषण स्थळी आलेली होते. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी करणार नाही.
मराठा नेते जरांगे पाटील यांनी देखील आरोग्य सुविधा घेतलेली नाही. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही.तोपर्यंत कुठल्याही प्रकारची तपासणी करणार नाही ,अशी भूमिका गोरख दळवी यांनी यावेळी मांडली.