नोंदणीकृत पत्रकारांना ही वृत्तसंकलनासाठी संचारबंदीच्या काळात सूट द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:19 AM2021-04-16T04:19:25+5:302021-04-16T04:19:25+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बुधवार (दि. १४) मध्यरात्रीपासून पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर घटकांना या ...

Registered journalists should be given exemption during this curfew | नोंदणीकृत पत्रकारांना ही वृत्तसंकलनासाठी संचारबंदीच्या काळात सूट द्यावी

नोंदणीकृत पत्रकारांना ही वृत्तसंकलनासाठी संचारबंदीच्या काळात सूट द्यावी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बुधवार (दि. १४) मध्यरात्रीपासून पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर घटकांना या संचारबंदीत बाहेर फिरता येणार नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि महामारीचे संकट रोखण्यासाठी सरकारने निर्णय घेताना केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच संचारबंदीच्या निर्बंधातून सूट दिली आहे. राज्यात अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची संख्या नाममात्र असून प्रत्यक्ष वृत्तसंकलनाचे काम करणाऱ्या माध्यमातील पत्रकारांची मोठी अडचण होणार आहे. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी प्रशासनाला योग्य दिशा दाखवण्याचे आणि जनतेला जागृत करण्याचे काम माध्यमात काम करणारे पत्रकार करत असतात. मात्र, विविध माध्यमात काम करणार बहुतांशी पत्रकारांकडे अधिस्वीकृती पत्रिका नसल्यामुळे संचारबंदीच्या काळामध्ये वृत्तसंकलन करण्यास अडचणी निर्माण होऊन याचा प्रशासन आणि शासनालाच फटका बसेल. जनतेला योग्य माहिती मिळणार नाही त्यामुळे जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे नोंद असलेल्या वृत्तपत्र,

वृत्तवाहिन्या, डिजिटल मीडियात काम करणाऱ्या अधिकृत पत्रकारांना संचारबंदीत वृत्तसंकलनासाठी सूट द्यावी. अन्यथा नाईलाजाने पत्रकारांना शासनाविरुद्ध असहकाराची भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे शासनाने जिल्हा प्रशासनाला आदेश द्यावेत. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माहिती महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Web Title: Registered journalists should be given exemption during this curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.