पोलीस आणि पत्रकारांची राेजच परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:52 AM2021-01-13T04:52:30+5:302021-01-13T04:52:30+5:30

केडगाव : पोलीस स्थापना दिन आणि पत्रकार दिन हे एकाच आठवड्यात साजरे हाेतात. हा माेठा याेगायाेग आहे. पाेलीस अधिकारी ...

Regular examination of police and journalists | पोलीस आणि पत्रकारांची राेजच परीक्षा

पोलीस आणि पत्रकारांची राेजच परीक्षा

केडगाव : पोलीस स्थापना दिन आणि पत्रकार दिन हे एकाच आठवड्यात साजरे हाेतात. हा माेठा याेगायाेग आहे. पाेलीस अधिकारी होण्यापूर्वीपासून पत्रकार आणि माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. केडगाव प्रेस क्लबच्या कायक्रमात पुन्हा सर्व पत्रकारांना एकत्र भेटण्याची संधी मिळाली. पाेलीस आणि पत्रकार यांचे जीवन सारखेच आहे. आपल्याला दरराेज परीक्षेला सामाेरे जावे लागते, असे प्रतिपादन पाेलीस अधीक्षक मनाेज पाटील यांनी केले.

केडगाप प्रेस क्लबच्या वतीने सावली संस्थेत आयोजित पत्रकार दिनाच्या कायक्रमात ते बाेलत हाेते.

यावेळी पत्रकार अशाेक साेनवणे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे नाशिक विभागीय परिषदेचे सचिव मन्सूर शेख, महापालिका स्थायी समितीचे सभापती मनाेज काेतकर, पाेलीस अधीक्षक पाटील यांचे चिरंजीव ऋषभ पाटील, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमाेल येवले, संग्राम काेतकर, केडगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष समीर मन्यार, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, एच. एम. मन्यार, विठ्ठल काेतकर, अजित पवार, सावली संस्थेचे नितेश बनसाेडे, जाहिरात संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल मुथा आदी उपस्थित हाेते. स्थायी समितीचे सभापती मनाेज काेतकर यांनी सावली संस्थेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Regular examination of police and journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.