जनतेने नाकारलेले उमेदवार भाजपला कसे चालतात ? : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:08 AM2019-08-24T11:08:28+5:302019-08-24T11:15:40+5:30

गत विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले. त्यांनाच सत्ताधारी नवीन पॅकिंगमधून बाजारात आणत आहेत

rejection of the candidates run for the BJP? : Supriya Sule | जनतेने नाकारलेले उमेदवार भाजपला कसे चालतात ? : सुप्रिया सुळे

जनतेने नाकारलेले उमेदवार भाजपला कसे चालतात ? : सुप्रिया सुळे

ठळक मुद्देनिलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा अरणगावात समारोप खासदार सुप्रिया सुळे यांची बंडखोरांवर टीकासाकळाईबाबत सरकारचे घूमजाव सूडाचे राजकारण सहन करणार नाहीमैं तो फकीर हॅूँ.. : लंके

केडगाव :  गत विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले. त्यांनाच सत्ताधारी नवीन पॅकिंगमधून बाजारात आणत आहेत. पण हा नाकारलेला माल जनता कसा स्विकारेल? असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही काँग्रेसच्या बंडखोरांवर टीका केली आहे.
राष्टÑवादीचे नेते निलेश लंके यांच्या १८ दिवसांपासून सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप शुक्रवारी सायंकाळी नगर तालुक्यातील अरणगाव येथे झाला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनशाम शेलार, अशोक सावंत, अभिषेक कळमकर, किसन लोटके, बबन डोंगरे, गोरख दळवी, अशोक झरेकर आदी उपस्थित होते. सभेला मोठी गर्दी होती. 
सुळे म्हणाल्या, नगरचे राजकारण फारच गमतीशीर आहे. कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही. निलेश लंके यांनी स्वार्थासाठी नव्हे, तर काही तरी बदल व्हावा म्हणून पक्ष बदलला. त्यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणा-यांनी हे लक्षात घ्यावे जर चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही तर आम्हीच तुमच्या संपत्तीची चौकशी लावू.

साकळाईबाबत सरकारचे घूमजाव 
 मुख्यमंत्री वाळकीत येऊन साकळाई योजनेचा शब्द देतात आणि त्यांचे मंत्री योजना होणार नसल्याचे सांगतात. मग खोटे नक्की कोण बोलते ? हे कळत नाही असे म्हणत साकळाई योजनेबाबत सरकार घूमजाव करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. 

सूडाचे राजकारण सहन करणार नाही
सत्ताधा-यांच्या विरोधात बोलला म्हणून त्रास देणार असाल आणि सूडाचे घाणेरडे राजकारण करणार असाल तर महाराष्टÑ कधीही सहन करणार नाही. विरोधक आमच्यासारखे दिलदार हवेत. शेतकरी कर्जमाफीसाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.


मैं तो फकीर हॅूँ.. : लंके
निलेश लंके म्हणाले, अनेकांना देवदर्शन घडवले म्हणून माझ्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होत आहे. पण ‘मेरी तो साईबाबा की झोली हैं. कभी भी भरती हंै, कभी भी खाली होती हैं. मैं तो फकीर हूॅँ.’ माझे बँकेत खातेच नाही. माझी कसली चौकशी करणार?  असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title: rejection of the candidates run for the BJP? : Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.