रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 05:24 PM2021-02-22T17:24:07+5:302021-02-22T17:25:12+5:30
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याने स्टॅडिंग वॉरंट विरोधात केलेला पुनर्निरीक्षण अर्ज सोमवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला.
अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याने स्टॅडिंग वॉरंट विरोधात केलेला पुनर्निरीक्षण अर्ज सोमवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला.
जरे यांच्या हत्याकांडात बोठे हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तो मात्र मिळून न आल्याने पोलिसांनी पारनेर न्यायालयात बोठे याच्या विरोधात स्टॅिडिंग वॉरंट मिळविण्यासाठी अर्ज केला होता.
न्यायालयाने ६ जानेवारी रोजी पाेलिसांचा अर्ज मंजूर करत वॉरंटला मंजूरी दिली. बोठे याने जिल्हा न्यायालयात अर्ज करून वॉरंटचा हुकूम रद्द करण्याची मागणी केली होती. या अर्जावर प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्यासमारे सुनावणी झाली.
यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. अनिल ढगे यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजुचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने बोठे याचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळून लावला.