आराम बसमधील तीस प्रवासी जखमी

By Admin | Published: May 15, 2014 10:58 PM2014-05-15T22:58:47+5:302023-10-30T11:56:31+5:30

करंजी : पुण्याहून नांदेडला जाणार्‍या खासगी आराम बसला नगर-पाथर्डी मार्गावरील करंजी घाटात अपघात होऊन तीस प्रवासी किरकोळ जखमी झाले.

Relaxing bus passengers injured | आराम बसमधील तीस प्रवासी जखमी

आराम बसमधील तीस प्रवासी जखमी

करंजी : पुण्याहून नांदेडला जाणार्‍या खासगी आराम बसला नगर-पाथर्डी मार्गावरील करंजी घाटात अपघात होऊन तीस प्रवासी किरकोळ जखमी झाले. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. धोकादायक वळण याबाबत समजलेली माहिती अशी की, पुण्याकडून नांदेड (सेलू) येथे प्रवासी घेऊन जाणारी ही बस (एमएच-३४ ए-८३८३) करंजी घाट उतरत असताना एका धोकादायक वळणाचा चालकाला अंदाज न आल्याने बस सरळ समोरील संरक्षक कठड्याला जावून धडकली. या धडकेनंतर बसचा काही भाग दरीत लोंबकळला तर पाठीमागील भाग संरक्षक कठड्याला अडकला. बस दरीत पडणार हे पाहून बसमधील प्रवासी घाबरले. प्रसंगावधान राखून त्यांनी बसच्या काचा फोडून बाहेर उड्या मारल्या. बस चालकही घाबरलेल्या स्थितीत होता. त्यानेही बसबाहेर उडी मारली, असे बसमधील प्रवासी गोविंद चांडक, दिनेश चांडक (रा.सेलू, जि.नांदेड) यांनी सांगितले. अपघात आणि पोलिसांचा योगायोग पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला तेव्हा करंजीमार्गे गस्तीसाठी जात असलेले पोलीस उपअधीक्षक वाय.डी.पाटील यांच्या हा अपघात निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ सर्व जखमींना नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. (वार्ताहर) घाट नव्हे मृत्युचा सापळा करंजी घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून घाटातील धोकादायक वळणाचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपासून करंजी घाट मार्गे बीड, नांदेड, पैठण मराठवाड्यातील खासगी बसची ये-जा वाढली आहे. रस्ता चांगला असल्याने नगर-पाथर्डी- शेवगाव मार्गे वाहनांची वर्दळ वाढली. तसेच अपघाताचेही प्रमाण वाढले आहे

Web Title: Relaxing bus passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.