कत्तलीसाठी चाललेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; चालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:27 PM2020-06-05T17:27:13+5:302020-06-05T17:27:55+5:30
कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय नऊ जनावरांची मुक्तता केली. बुधवारी सांयकाळी सहा वाजता राशीन पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत वाहतूक करणाºया टेम्पोसह चालकास अटक करण्यात आली आहे.
राशीन : कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय नऊ जनावरांची मुक्तता केली. बुधवारी सांयकाळी सहा वाजता राशीन पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत वाहतूक करणा-या टेम्पोसह चालकास अटक करण्यात आली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. राशीन येथे कत्तलीसाठी काही जनावरे घेऊन येणार असल्याची माहिती राशीन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राशीन बसस्थानकासमोरील राशीन- सोनाळवाडी रस्त्यावर जनावरांना घेऊन येणारा टेम्पो (एन.एच.४२, टी.१०५२) पकडला. टेम्पोत नऊ जनावरे होती. यावेळी टेम्पो चालक मनोज साळवे यास अटक करण्यात आली आहे. यावेळी ताब्यात घेण्यात आलेली जनावरे गोशाळेत पाठविण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस उपाधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस नाईक मारूती काळे, गणेश ठोंबरे यांनी ही कारवाई केली.