फुटेजद्वारे आरोपींची छायाचित्रे जारी

By Admin | Published: September 17, 2014 11:23 PM2014-09-17T23:23:37+5:302024-06-12T12:23:01+5:30

अहमदनगर : सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील सॅमसंग कंपनीचे मोबाईल शॉपीच्या दुकानातून चौघांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले

Release of photographs of accused by footage | फुटेजद्वारे आरोपींची छायाचित्रे जारी

फुटेजद्वारे आरोपींची छायाचित्रे जारी

अहमदनगर : सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील सॅमसंग कंपनीचे मोबाईल शॉपीच्या दुकानातून चौघांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले आहे. या फुटेजवरून पोलिसांनी चोरट्यांची छायाचित्रे जारी केली आहेत.
मार्केटयार्ड परिसरातील मुंजोबा स्वीटशेजारी असलेल्या परफेक्ट मोबाईल शॉपीमध्ये सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान चोरी झाली होती. यामध्ये ७ लाख ८८ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी शोरुमचे मालक धीरज शिवदास डागा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी शोरुममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले असता झोपण्यासाठी आल्याचे सोंग घेऊन चोरट्यांनी शोरुमचे कुलूप तोडून चोरी केल्याचे स्पष्ट झाले होते.
या फुटेजमध्ये चोरट्यांची छायाचित्रे स्पष्ट दिसत असल्याचे पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी सांगितले. यामधील आरोपींबाबत कोणाला काही माहिती असल्यास कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
सीसीटीव्हीमधील चित्रणानुसार दुकानात जाऊन मोबाईल चोरणाऱ्या आरोपीने राखाडी रंगाची ट्रॅकपॅन्ट, गोल गळ््याचा टी शर्ट, फिक्कट पोपटी रंगाचा टी शर्ट असा पेहराव घातलेला आहे. बाहेर असलेला दुसरा आरोपी हा शरीरयष्टीने मजबूत असून त्याने पांढऱ्या रंगाचा हाफ टी शर्ट घातलेला आहे. तिसरा आरोपी बरमुडा पॅन्ट व हाफशर्टवर आहे. दोघांकडे सॅक असून सर्वांचे वय २५ ते २८ दरम्यान आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Release of photographs of accused by footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.