कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:08+5:302021-05-09T04:22:08+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास चारशेने घटल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. नगर शहरातही रुग्णसंख्या निम्म्याने घटली आहे. ...

Relief from the declining number of corona patients | कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा

कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास चारशेने घटल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. नगर शहरातही रुग्णसंख्या निम्म्याने घटली आहे. शनिवारी ३ हजार ६१२ बाधितांची भर पडली आहे. बाधित रुग्णांपेक्षा ४ हजार १८२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या २६ हजार ४१९ इतके सक्रिय रुग्ण असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने पत्रकात नमूद केले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०१८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९४५ आणि अँटिजन चाचणीत ६४९ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर २९, अकोले १७०, जामखेड १, कर्जत १०७, कोपरगाव १९, नगर ग्रामीण ४६, नेवासा ९८, पारनेर ९४, पाथर्डी १३८, राहता ९२, राहुरी ५६, संगमनेर ७८, शेवगाव २, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ५१, कँटोन्मेंट बोर्ड ६, मिलिटरी हॉस्पिटल १५ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ३४५, अकोले १९०, जामखेड ११, कर्जत २३, कोपरगाव ७२, नगर ग्रामीण १९९, नेवासा १२०, पारनेर ७०, पाथर्डी ३१, राहाता १२८, राहुरी ७५, संगमनेर ३६१, शेवगाव २४, श्रीगोंदा ४४, श्रीरामपूर १४३, कँटोन्मेंट बोर्ड ५२ आणि इतर जिल्हा ५३ आणि इतर राज्य ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत आज ६४९ जण बाधित आढळून आले. नगर शहर ५४, अकोले ४, जामखेड १, कर्जत ९७, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण २९, नेवासा २३, पारनेर ९१, पाथर्डी २४, राहाता १५, राहुरी १३३, संगमनेर ३, शेवगाव १२, श्रीगोंदा ६६, श्रीरामपूर ३५ आणि इतर जिल्हा ७ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, २४ तासांत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.

--------

कोरोना स्थिती

बरे झालेल्यांची संख्या : १,७७,२८६

उपचार सुरू असलेले रुग्ण : २६,१४९

मृत्यू : २,२८२

एकूण रुग्णसंख्या : २,०५,९८७

--

जिल्ह्याची रुग्णसंख्या दोन लाख पार

जिल्ह्यात गतवर्षी १२ मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. तेंव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही २ लाख ५ हजार ९८७ इतकी झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोज सरासरी चार हजार रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आणि एकूण रुग्णसंख्या दोन लाखांच्याही पुढे गेली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ७७ हजार इतकी झाली आहे.

Web Title: Relief from the declining number of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.