कमी रुग्णसंख्येमुळे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:34 AM2020-12-14T04:34:14+5:302020-12-14T04:34:14+5:30
अहमदनगर : गेल्या चार-पाच दिवसांपासून दरदिवशी सरासरी दोनशे जणांचीच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांसह ...
अहमदनगर : गेल्या चार-पाच दिवसांपासून दरदिवशी सरासरी दोनशे जणांचीच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांसह आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान रविवारी १७१ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून १४१ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या केवळ १३६८ जणांवरच उपचार सुरू आहेत.
रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६५ आणि अँटिजन चाचणीत ४४ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (४३), अकोले (१०), कर्जत (१६), कोपरगाव (९), नगर ग्रामीण (६), पारनेर (१२), पाथर्डी (१५), राहाता (२१), संगमनेर (१३), श्रीरामपूर (४), जामखेड (१), नेवासा (५), राहुरी (२), नेवासा (७), शेवगाव (८), श्रीगोंदा (४) अशा रुग्णांचा समावेश आहे.
------------------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ६४०६०
उपचार सुरू असलेले रुग्ण : १३६८
मृत्यू : ९७६
एकूण रुग्णसंख्या : ६६४०४