जिल्हाधिका-यांचे आदेश डावलून धार्मिक प्रवचन,श्रीरामपुरातील घटना, जैन संघाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 03:08 PM2020-06-15T15:08:29+5:302020-06-15T15:10:50+5:30
श्रीरामपूर : येथील स्थानकवासी जैैन संघाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन करून धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला. याप्रकरणी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेश इंद्रभान लोढा यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अशा स्वरुपाची झालेली ही पहिलीच कारवाई मानली जात आहे.

राज्य सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवलेली आहेत. धार्मिक उत्सवांच्या आयोजनास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. मात्र असे असताना रविवारी सकाळी नऊ ते साडे दहा वाजेदरम्यान स्थानकवासी जैैन संघाच्या कार्यालयामध्ये हा प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.
पोलीस शिपाई अर्जून पोकळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संघाचे अध्यक्ष रमेश लोढा यांच्यावर रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस नाईक संजय दुधाडे तपास करत आहेत.
जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन व अवमान करून स्थानकवासी जैैन संघाच्या वतीने येथे धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी स्वत:हून ही कारवाई केली आहे. प्रशासनाने गर्दी करणाºया सार्वजनिक स्वरुपाच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घातलेली आहे.