तातडीने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:19 AM2021-04-11T04:19:53+5:302021-04-11T04:19:53+5:30

रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली असताना सुद्धा उपलब्ध होत नाही. या इंजेक्शनचा साठा करून ठेवला आहे का? याबाबत कोणतीही स्पष्टता ...

Remedacivar injection should be supplied immediately | तातडीने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा

तातडीने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा

रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली असताना सुद्धा उपलब्ध होत नाही. या इंजेक्शनचा साठा करून ठेवला आहे का? याबाबत कोणतीही स्पष्टता होऊ शकत नसल्याने या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर आल्याने रूग्‍णांच्या नातेवाईकांची होत असलेली वणवण आणि लुटमार थांबविण्यासाठी शासनानेच जिल्ह्यात आणि राहाता तालुक्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा त्वरित उपलब्ध करुन द्यावा.

जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. हॉस्पिटलमधून आकारण्यात येत असलेली बिल, रूग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात येत असलेली अमानवी वागणूक असे संतापजनक प्रकार घडत असताना सुद्धा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने याबाबतही आपण व्यक्तिगत लक्ष घालून जनतेला दिलासा देण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात, असे पत्रात म्हटले आहे.

Web Title: Remedacivar injection should be supplied immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.