कोरोना योद्ध्यांसाठी रेमडेसिविर, ऑक्सिजन राखीव ठेवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:23+5:302021-04-22T04:20:23+5:30

कोपरगाव : कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे कोरोना योद्धे, विशेषतः नगर परिषद, महसूल ...

Remedesivir for Corona Warriors, the need to reserve oxygen | कोरोना योद्ध्यांसाठी रेमडेसिविर, ऑक्सिजन राखीव ठेवण्याची गरज

कोरोना योद्ध्यांसाठी रेमडेसिविर, ऑक्सिजन राखीव ठेवण्याची गरज

कोपरगाव : कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे कोरोना योद्धे, विशेषतः नगर परिषद, महसूल विभाग, पोलीस विभाग, सर्व वैद्यकीय सेवा डॉक्टर, नर्सेस, आशा सेविका, काही शिक्षक, पत्रकार अशा सतत सेवेत असणाऱ्यांना जर कोरोनाची लागण झाली, तर तातडीने उपलब्ध व्हावेत, म्हणून रेमडेसिविर व ऑक्सिजनचा राखीव साठा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वहाडणे म्हणाले, दुर्दैवाने आजपर्यंत अनेक कोरोना योद्धेही सेवा करताना कोरोनाला बळी पडले आहेत. प्रत्यक्षात कोरोना बळींवर अंत्यसंस्कार करणारे सफाई कर्मचारी तर जास्तच बिकट परिस्थितीत काम करीत आहेत. कोरोना योद्ध्यांना व त्यांच्या कुटुंबियांना या इंजेक्शन व ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागणे योग्य नाही. म्हणून जिल्हाधिकारीसाहेबांनी या मागणीची तातडीने दखल घ्यावी, तरच आपली सर्व यंत्रणा कार्यक्षमतेने काम करू शकेल. प्रत्यक्ष लढणारी यंत्रणा सुदृढ ठेवणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.

Web Title: Remedesivir for Corona Warriors, the need to reserve oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.