रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हा परिषदेने खरेदी करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:24+5:302021-04-10T04:20:24+5:30
अहमदनगर : कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी आवश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हा परिषदेने खरेदी करून ते ग्रामीण भागात स्वतः विक्री करावे, ...
अहमदनगर : कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी आवश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हा परिषदेने खरेदी करून ते ग्रामीण भागात स्वतः विक्री करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केले आहे.
कोरोना आजारावर आवश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन सध्या मिळेनासे झाले आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर साधारण पाच ते सहा डोस या इंजेक्शनचे लागतात. त्याची मूळ किंमत आठशे रुपये असताना कंपनीची एमआरपी पाच हजार रुपयांच्या पुढे छापलेलली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना चढ्या भावाने इंजेक्शन खरेदी करावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोकांना हे इंजेक्शन वेळेवर मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने इंजेक्शन खरेदी करावे आणि ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल होणार नाहीत आणि इंजेक्शन खरेदीमध्ये काळाबाजार होणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने कुठलाही आर्थिक ताण सहन न करता मूळ किमतीला हे इंजेक्शन खरेदी करावे व मूळ किमतीला रुग्णांना द्यावे. त्यातून नागरिकांना पाच ते सहा हजार रुपयांना इंजेक्शन घ्यावे लागणार नाही आणि त्यांचे एक हजार रुपये वाचतील त्यामुळे या सूचनेचा विचार करावा, अशी मागणी वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडे केली आहे.