रेमडेसिविर,ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:21 AM2021-04-22T04:21:01+5:302021-04-22T04:21:01+5:30
शेवगाव : जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत असून, याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, तसेच जिल्ह्यातील ...
शेवगाव : जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत असून, याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, तसेच जिल्ह्यातील रुग्णांना तातडीने रेमडेसिविर व ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेवगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, शेवगाव तालुक्यात कोरोनाची भीषण व भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक रुग्णांना कोरोनावरील औषधे, रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाहीत; तसेच बेड, ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यावर तातडीने कार्यवाही करावी, तसेच तालुक्यातील कोरोना चाचणी केंद्र व लसीकरण केंद्र एकाच ठिकाणी असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. तरी लसीकरण व चाचणी केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी करावेत, तसेच शेवगाव शहरातील विविध ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात यावीत, जेणेकरून शहरातील नागरिकांना सोईचे होईल व एकाच ठिकाणी होणाऱ्या गर्दीसदेखील आळा बसेल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.