धामणगाव आवारीच्या ग्रामस्थांनी दिला आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:41+5:302021-09-16T04:27:41+5:30

इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते फादर बाखर यांनी १९९२ साली धामणगाव आवारी येथे अकोले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा ...

Reminisce about the memories given by the villagers of Dhamangaon Awari | धामणगाव आवारीच्या ग्रामस्थांनी दिला आठवणींना उजाळा

धामणगाव आवारीच्या ग्रामस्थांनी दिला आठवणींना उजाळा

इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते फादर बाखर यांनी १९९२ साली धामणगाव आवारी येथे अकोले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजेनेच्या शिबिरानिमित्ताने भेट दिली होती. गावातील लोकांचा उत्साह पाहून त्यांनी १९९५ साली गाव दत्तक घेतले. याठिकाणी सिमेंटचे ७ तर मातीचे १८ बंधारे बांधले. या कामासाठी त्यांनी त्याकाळी जर्मन सरकारच्या नाबार्ड बँकेमार्फत सुमारे एक कोटींहून अधिक रुपयांचा निधी या गावातील पाणलोट क्षेत्र विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला. त्यात त्यांनी श्रमदानातून लोकांचा सहभागही मिळविला होता. या भागातील डोंगरावरील वृक्षारोपण, समतल चर, बांधबंदिस्ती असे ‘माती आडवा, पाणी जिरवा’ची मोठी कामे त्यांनी केली होती. तब्बल सहा वर्षे ही विविध कामे सुरू होती. या काळात त्यांनी १० ते १५ वेळा या गावास भेट दिली होती.

आप्पासाहेब आवारी, बाळासाहेब भोर, राधाकिसन पोखरकर, बाळासाहेब आवारी, रमेश आवारी, बापू आवारी, विजय आवारी, गणेश पापळ, किसन आवारी, अशोक देशमुख यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...................

देवमाणूस हरपला

फादर हर्मन बाखर यांचे काल निधन झाल्याची बातमी कळताच ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले. बुधवारी (दि.१५) ग्रामपातळीवर श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी गावासाठी केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा देत 'देवमाणूस' हरपला, फादर बाखर यांनी आपल्या गावासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

**********

सोबत फोटो : १५ धामणगाव आवारी

धामणगाव आवारी येथे फादर हर्मन बाखर यांना ग्रामस्थानी श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Reminisce about the memories given by the villagers of Dhamangaon Awari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.