कोपरगावातील आजी - माजी नगराध्यक्षांचे अतिक्रमण काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:30+5:302021-02-13T04:20:30+5:30

कोपरगाव : नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष विजय वहाडणे व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी कोपरगाव शहरात सरकारी जागेत केलेले अतिक्रमण ...

Remove the encroachment of the grandmother - former mayor of Kopargaon | कोपरगावातील आजी - माजी नगराध्यक्षांचे अतिक्रमण काढा

कोपरगावातील आजी - माजी नगराध्यक्षांचे अतिक्रमण काढा

कोपरगाव : नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष विजय वहाडणे व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी कोपरगाव शहरात सरकारी जागेत केलेले अतिक्रमण काढावे, या मागणीचे शहरातील संभाजी जाधव यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले आहे.

राजेंद्र झावरे नगराध्यक्ष म्हणून सत्तेवर असताना त्यांनी सरकारी भूखंडावर शैक्षणिक संकुल इमारत उभारली. शहरात विविध ठिकाणी टपऱ्या उभ्या केल्या आहेत. तर विद्यमान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शहरातील धारणगाव रोड लगत सरकारी जागेवर दोन ठिकाणी अतिक्रमण करून स्वतःचे प्रतिष्ठान, रेस्टॉरंट अतिक्रमण करून उभे केले आहे. त्यामुळे या दोन्ही आजी - माजी नगराध्यक्षांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील एका कोल्ड्रिंक्सच्या टपरीचे काम चालू आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेने हे सरकारी जागेतील अतिक्रमण काढावे असेही म्हटले आहे.

............

आमच्या शाळेची इमारत ज्या जागेत उभी आहे. ती जागा नगरपरिषदेकडून कायमस्वरूपी करारपद्धतीने घेतलेली आहे. त्यानुसार दरवर्षी कराराची रक्कम व इतर कराची रक्कम ही नगरपरिषदेला भरण्यात येते. त्यामुळे हे अतिक्रमण नाही.

- राजेंद्र झावरे, माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद, कोपरगाव

..........

एका जागेत झोपडपट्टीतील मुलांसाठी, नागरिकांसाठी मी पूर्वी मोफत दवाखाना व मोफत बालवाडी चालवीत होतो. कालांतराने आर्थिक अडचणीमुळे ते बंद करावे लागले. आता तेथे भंगारचे दुकान आहे. त्यामुळे त्या जागेशी माझा काहीही संबंध नाही. तसेच रेस्टाॅरंट असलेली जागा ही खासगी मालकाची असून ती मी भाडे तत्त्वावर घेतलेली आहे. त्यामुळे ही पूर्णपणे चुकीची तक्रार आहे.

-विजय वहाडणे, नगराध्यक्ष नगरपरिषद, कोपरगाव

Web Title: Remove the encroachment of the grandmother - former mayor of Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.