मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राहात्यात दहन....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:49 PM2020-08-09T17:49:04+5:302020-08-09T17:50:05+5:30
कर्नाटक सरकारने कर्नाटकमधील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून हटविल्याच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटले आहेत. राहाता शहरात या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (९ आॅगस्ट) शिवसेनेचे नेते, पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालून पुतळा दहन केले.
राहाता : कर्नाटक सरकारने कर्नाटकमधील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून हटविल्याच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटले आहेत. राहाता शहरात या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (९ आॅगस्ट) शिवसेनेचे नेते, पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालून पुतळा दहन केले.
या घटनेबद्दल शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय..., जय भवानी.. जय शिवाजी...च्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. यावेळी येडियुरप्पा सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे राहाता नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी मनगुत्ती गावामध्ये वाजतगाजत व लाखो मराठी मावळ्यांच्या उपस्थितीतमध्ये सन्मानाने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा. बेळगांव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी मागणी केली.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढील आदेशाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी दिला .
याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल, जाबिर पठाण, नारायण तांबे, कैलास साठे, पोपट तुपे, दिलीप घोडेकर, अनिकेत तुपे, राज लांडगे, शुभम वाघ, गणेश होले, रोहित तुपे, आकाश कासार, नवनाथ मुर्तडक, ऋषिकेश क्षीरसागर, शुभम दुसाने आदी शिवसैनिक उपस्थित होते.