व्हॉटसअॅप ग्रुपवरून काढले, अॅडमीनवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:17 PM2018-05-19T13:17:03+5:302018-05-19T13:17:23+5:30
व्हॉटसअॅप गु्रपवरून काढून टाकल्याने चौघा जणांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत चैतन्य शिवाजी भोर (वय १८रा. माळकूप ता. पारेनर) हा गंभीर जखमी झाला आहे.
अहमदनगर: व्हॉटसअॅप गु्रपवरून काढून टाकल्याने चौघा जणांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत चैतन्य शिवाजी भोर (वय १८रा. माळकूप ता. पारेनर) हा गंभीर जखमी झाला आहे.
१७ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवरील विखे हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी भोर याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दाखल केली. पोलीसांनी अमोल गडाख, सचिन गडाख यांच्यासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैतन्य भोर १७ मे रोजी विखे हॉस्पिटलजवळील मेसजवळ उभा असताना सचिन गडाख याच्या सांगण्यावरून अमोल व त्याच्या दोन साथीदारांनी सचिन याला व्हॉटसअॅप ग्रुपवरून का काढले अशी विचारणा केली. यावेळी चैतन्य याच्यावर अमोल व याने धारधार शस्त्राने वार केला. या घटनेत चैतन्य याच्या पोटाला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर चैतन्य याला विखे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलीसांनी हॉस्पिटलध्ये जावून चैतन्य याचा जबाब घेतला. त्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरिक्षक गोेरे हे करत आहेत.