तोफखाना ठाण्यात 'डिबी'चे पुनर्गठन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:34+5:302021-04-13T04:19:34+5:30
मागील महिन्यात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यास भेट देत गुन्ह्याचा आढावा घेतला तेव्हा अनेक तपास ...
मागील महिन्यात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यास भेट देत गुन्ह्याचा आढावा घेतला तेव्हा अनेक तपास प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. तसेच तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंग, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गुन्ह्याच्या तुलनेत तपास तातडीने होत नसल्याने पोलीस अधीक्षक पाटील यांनी डिटेक्शन ब्रँच बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे उपनिरीक्षक गायकवाड यांनी तत्काळ 'डीबी' बरखास्त केली होती. आता गायकवाड यांनी ११ एप्रिल रोजी डीबीचे नव्याने पुनर्गठन केले असून, यामध्ये पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, हवालदार बार्शिकर काळे, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, सतीश त्रिभुवन, चेतन मोहिते, अनिकेत आंधळे आणि संतोष राठोड यांचा समावेश आहे.
..........
वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल का?
गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील अशी तोफखाना पोलीस ठाण्याची ओळख आहे. या ठाण्याच्या हद्दीत सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. आता डिटेक्शन ब्रँचमधील नवीन कर्मचारी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.