रेल्वे फाटकाच्या रुळातील खड्डे दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:38+5:302021-01-09T04:16:38+5:30
वारी येथील रेल्वे फाटकातून (समपार फाटक क्र. ६२ )स्थानिक ग्रामस्थ, वैजापूर, शिर्डीकडे दररोज हजारो वाहने जात असतात. विदर्भ, मराठवाडा ...
वारी येथील रेल्वे फाटकातून (समपार फाटक क्र. ६२ )स्थानिक ग्रामस्थ, वैजापूर, शिर्डीकडे दररोज हजारो वाहने जात असतात. विदर्भ, मराठवाडा येथील शिर्डीला जाणाऱ्या साईपालख्या याच फाटकातून जातात. या फाटकाच्या रुळांच्या दुरुस्तीचे काही महिन्यांपूर्वी काम करण्यात आले होते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने येथे खोदाई केली होती. काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून डांबर टाकून रुळांच्या फटीतील खड्डे हे डांबराच्या साह्याने बुजविण्यात येत असतात. परंतु, यावेळी काम होऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या रुळातील फटीमधील खड्डे दुरुस्त केलेले नाहीत. फाटकातील रेल्वे रूळ हे वर आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. येथून जाताना दुचाकीवरील वयोवृद्ध व्यक्ती, महिला, लहान मुले हे या खड्ड्यांमुळे गाडीवरून रेल्वे रुळावर पडून दुखापत होत आहे. तसेच इतर वाहनांचेही अपघात होत आहेत. तसेच सध्या कारखाने सुरू असल्याने उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांनादेखील मोठी कसरत करावी लागत आहे.
...........
फोटो०७ - वारी रेल्वे फाटक, कोपरगाव