मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती; उद्या उपनगरात पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 06:52 PM2019-05-03T18:52:54+5:302019-05-03T18:53:51+5:30
महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील जुन्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती शनिवारी (दि.४) करण्यात येणार आहे.
अहमदनगर : महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील जुन्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती शनिवारी (दि.४) करण्यात येणार आहे. त्यासाठी शटडाउन घेण्यात येणार असून त्यामुळे उपनगर भागात सकाळी ११ नंतर होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.
जलवाहिनी दुरुस्तीच्या कामावेळी पाणी उपसा बंद राहणार असल्याने शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसर, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, व तसेच स्टेशन रोड परिसर, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर आदी भागास सकाळी ११ नंतर पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. उन्हाळ्यात नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी या उपनगर भागास रविवारी (दि.५) नेहमीच्या वेळेत पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचेही मनपाने स्पष्ट केले आहे