पिंपळगाव खांडच्या आणखी एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; अकोले तीन दिवस बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:45 PM2020-05-29T12:45:08+5:302020-05-29T12:45:50+5:30
घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेल्या आणखी एका महिलेचा कोरोना तपासणी अहवाल शुक्रवारी (दि.२९ मे) पॉझिटिव्ह आला आहे. आता अकोले तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात झाली आहे.
अकोले : घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेल्या आणखी एका महिलेचा कोरोना तपासणी अहवाल शुक्रवारी (दि.२९ मे) पॉझिटिव्ह आला आहे. आता अकोले तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात झाली आहे.
घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली ही महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहे. गुरुवारच्या (दि.२८ मे) तपासणी अहवालात पिंपळगाव खांड येथील ४५ वर्षीय पुरुष व त्याची १८ वर्षे वयाची कन्या कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. पिंपळगाव खांड येथील कोरोना बधितांची संख्या आता चार झाली आहे.
दरम्यान अकोले शहरात व्यापाºयांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून अकोलेकरांनी पुकारलेल्या जनता कर्फ्युला प्रतिसाद दिला आहे. अकोले तीन दिवस बंद राहणार आहे.