शिवसेना आमदारांवर ॲट्रॉसिटी नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:29+5:302021-07-07T04:26:29+5:30
राहुरी : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी गुन्ह्याविरोधी बेताल वक्तव्य केल्याने गायकवाड यांच्यावर ...
राहुरी : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी गुन्ह्याविरोधी बेताल वक्तव्य केल्याने गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच राहुरी तालुक्यातील खडांबे येथील ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब लटके यास तत्काळ अटक करावी, राहता तालुक्यातील रांजणगाव येथील दलित युवक रवींद्र लोंढे याच्यावर काही गुंडांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, आदी मागण्यांसाठी राहुरी तहसीलवर आरपीआयच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
खामगाव तालुक्यातील दलित अत्याचारप्रकरणी चितोडा गावातील रमेश हिरवाळे या दलित तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. हा प्रकार अत्यंत गंभीर असतानाही तेथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या गावात जाऊन चिथवणीखोर वक्तव्य करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत आमदारांवर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. वरील मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावरही मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. मागण्यांचे निवेदन डीवायएसपी संदीप मिटके, तहसीलदार फसियोद्दीय शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडे दिले. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास साळवे, बाळासाहेब जाधव, विजय वाकचौरे, श्रावण वाघमारे, सिमा बोरूडे, स्नेहल सगळगिळे, रमेश गायकवाड, गोविंद दिवे, सचिन साळवे, दत्तात्रय भोसले आदी उपस्थित होते.
...............................
050721\img-20210705-wa0126.jpg
त्या आमदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा आरपीआयचा राहुरी तहसीलवर मोर्चा